राज्यस्तरीय धनगर समाज वधुवर परिचय मेळावा लातूरात
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार उद्घाटन
लातूर : (प्रतिनिधी)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळ लातूरच्या वतीने दरसाल होत असलेल्या या वर्षीच्या १७ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधुवर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून दि़ १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथे होणाºया मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अॅड़ मा़ गो़ मांडुरके यांनी दिली़
या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून लातूर विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक गोपिनाथ कोळेकर, जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले उपस्थित राहणार आहेत़ या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आलेल्या इच्छूक वधुवरांची माहिती पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे़ या मेळाव्यात येणाºया समाज बांधवांची निवास, अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था मंडळातर्फे नि:शुल्क करण्यात आली असून जिल्ह बँकेचे माजी संचालक संभाजीराव सुळ यांनी हे भोजन प्रायोजकत्व स्विकारले आहे़
या मेळाव्याच्या अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि आयोजनासंदर्भात विविध आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु आहे़ मंडळाचे उपाध्यक्ष डॉ़ सिद्राम सलगर, सचिव अॅड़ मंचकराव ढोणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे, संभाजीराव सुळ, सुभाष लवटे, रामराव रोडे, सुजित वाघे, रामचंद्र मदने, सिद्राम धायगुडे, रामकिशन मदने, नवनाथ कवितके, सुरेश अभंगे, उद्धव दुधाळे, जीवन करडे, संभाजी बैकरे, संपत गंगथडे, मनोज राजे, राजेश बनसोड, दगडू हजारे, राम पाटील आदी प्रयत्नशील आहेत़ मेळाव्यास धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मा़ गो़ मांडूरके यांनी केले़