जनता हीच संपत्ती निलंगेकर साहेबांनी आपल्या जिवनात कमावली
अशोकराव पाटील निलंगेकरांना आमदार म्हणून निलंगेकर साहेबांना पहायचे होते.-माजीमंत्री यशोमती ठाकूर
निलंगा, : माझ्या वडीलांनी माजी मुख्यमंत्री डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत काम केले असून मी पण पहील्यांदा आमदार झाले तेंव्हा निलंगेकर साहेबही आमदार होते त्यांमुळे त्यांचा सहवास लाभला अतिशय अभ्यासू व प्रशासन व शासन यामधील खडा ना खडा माहीती निलंगेकरांनी होती त्यामुळे जमलेला मोठा समुदाय पाहता त्यांनी केवळ जनता हीच संपत्ती आपल्या आयुष्यात कमावली असल्याचे मत माजी महीला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थित माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजीमंत्री दिलीपराव देशमुख, सुशीलाताई पाटील निलंगेकर, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजीमंत्री संजय बनसोडे, रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्ह्यातील माजी खासदार, माजी आमदार प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, निलंग्या सारख्या सिमेवरील तालुका असलेल्या याभागाचा विकास हाच उद्देश त्यांचा होता. सिंचनाच्या अनेक सुविधा त्यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात केल्या असून अनेक खात्याचे मंत्री राहीले आहेत. नासिक व अमरावती भागात सिंचन प्रकल्पाचे काम त्यांच्या काळात झाले आहेत. मराठवाड्यातील अनेक मोठी प्रकल्प ही निलंगेकराची देण असून औरंगाबाद येथे उच्च न्यायालय हे काम केवळ त्यांच्या मुळेच शक्य झाले. अशोकराव पाटील निलंगेकर हे माझे दाजी असून यांच्या पत्नी संगीताताई पाटील निलंगेकर ह्या माझ्या नणंद आहेत. जेव्हा मी आमदार झाल्यानंतर दादासाहेबांकडे गेलेअसता तु आमदार झाली आता अशोकला कधी आमदार करणार म्हणून त्यानी विचारले तेंव्हा आता अशोक भैय्याना एकवेळ आमदार करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होते.