म.मुस्लिम कबीर यांना ” आफताब ए सहाफत ” विभागीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
औसा (इकबाल शेख)-नांदेडच्या खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संस्थेने विभागीय पत्रकारिता पुरस्कार “आफताबे सहाफत” (पत्रकारितेचा सूर्य) म.मुस्लिम कबीर यांना जाहीर केला आहे जो नांदेड येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी दिला जाणार आहे.ऐतिहासिक औसा शहरातील उर्दू पत्रकार,स्तंभ लेखक म.मुस्लिम कबीर ज्यांना उर्दू जगतात “रोशन औसवी” म्हणून ओळखले जाते. रोशन औसवी यांच्या गझल,नज्म उर्दू वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात.म.मुस्लीम कबीर हे सा.लातूर रिपोर्टरचे सहसंपादक आणि स्तंभलेखक देखील आहेत ते प्रत्येक वेळी आपले विचार मांडतात. “कबीर बानी” या नावाने त्यांचे अग्रलेख सुद्धा वाचनीय असतात.याशिवाय,ते डझनभर उर्दू वर्तमान पत्रांचे प्रतिनिधित्व करतात. कबीर सरांचा उर्दू विषयी असलेला स्नेह,उर्दू जिवंत ठेवण्याच्या तळमळीवर नांदेडच्या खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संस्थेने विभागीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड केली आहे.म.मुस्लिम कबीर यांना “आफताबे सहाफत” (पत्रकारितेचा सूर्य) विभागीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व पत्रकार व मित्र परिवारांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.