मृतप्राय किल्लारी”ला आ.अभिमन्यू पवारांनी दिली सजीवींनी..!
१११ दिवसाच्या अथक परिश्रमातून सुरू झाला किल्लारी साखर कारखाना
औसा – तांत्रिकदृष्ट्या किल्लारी कारखाना सुरू करणे आव्हानात्मक होते.या कामात अडचणी खूप आल्या काही कृत्रिम तर काही अडचणी आणल्या गेल्या मात्र त्यावर मात करीत किल्लारी आज सुरू होत आहे. मारुती महाराज प्रमाणेच किल्लारी कारखाना सुध्दा विक्रीसाठी निघाला होता. मात्र आपल्या प्रयत्नाने हे दोन्ही साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे राहिले आहेत. मृतप्राय असलेल्या किल्लारी साखर कारखाना सरकारच्या माध्यमातून सुरू होत असून हि महाराष्ट्रातील दुर्मिळ उदाहरण असून किल्लारी साखर कारखान्यातून औसा तालुक्यातील इतर साखर कारखान्या पेक्षा अधिकचा भाव देऊ अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
ते (दि.९) रोजी किल्लारी साखर कारखाना गव्हाण पूजनप्रसंगी बोलत होते याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले, जेष्ठ माजी संचालक गुडाप्पा बिराजदार, निवृत्ती भोसले, संताजी चालुक्य, संयुक्त उपनिबंधक ज्योती लाटकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, डीडीआर पी.आर.फडणीस, एस.आर. नाईकवाडी, हभप दतात्रय पवार गुरुजी, कार्यकारी संचालक आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी सभासद उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ माजी संचालक गुंडप्पा बिराजदार व निवृत्ती भोसले या ज्येष्ठांच्या हस्ते गव्हाण व यंत्र पूजन करून ऊस गाळपास प्रत्यक्षात सुरुवात झाली.यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी त्याच्या कार्यक्षेत्रातील हक्काचा कारखाना म्हणून किल्लारी साखर कारखाना सुरू केला आहे.हा कारखाना वाचविण्यासाठी तो सक्षम करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे.बेलकुंड येथील मारुती महाराज साखर कारखान्याप्रमाणे १३ कोटींमध्ये किल्लारी कारखाना विक्रीसाठी निघाला होता. मात्र आपल्या प्रयत्नाने हे दोन्ही साखर कारखाने आज शेतकऱ्यांच्या मालकीचे राहिले आहे.शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून या साखर कारखान्यात शंभर टक्के इथेनॉल अथवा साठ टक्के इथेनॉल व चाळीस टक्के साखर निर्मिती करता येईल का यासाठी विचार केला जात आहे. एक – दोन हंगामाचा अपवाद वगळता मागच्या १५ वर्षांपासून बंद असलेला आणि कोट्यवधींची देणी बाकी असलेला किल्लारी कारखाना सुरु करणं मोठ्या जिकिरीचं काम होत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांचे भक्कम पाठबळ आणि सहकारी आमदार ज्ञानराज चौगुले यांची तितकीच भक्कम साथ लाभल्यामुळेच हा शिवधनुष्य पेलता आला असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
…………………………..
आ अभिमन्यू पवार यांनी १११ दिवसांत कारखाना प्रत्यक्षात सुरु करून दाखवला.
१-२ हंगामाचा अपवाद वगळता किल्लारी कारखाना मागच्या १५ वर्षांपासून बंद होता. सभासदांनी कारखाना सुरु होईल याची आशाही सोडून दिली होती. शेतकऱ्यांचे सुदैवाने जून महिना अखेरीस राज्यात सत्तांतर झाली आणि आ अभिमन्यू पवारांनी किल्लारी कारखान्याचा विषय अजेंड्यावर घेतला. २६ जुलै रोजी कारखाना सुरु करण्यासंदर्भातील १२४ ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. आ पवार यांच्या दमदार पाठपुराव्यामुळे किल्लारी कारखान्याला शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास २० ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली. शासकीय भागभांडवल मंजूर झाले तरी कारखाना यावर्षीच चालू होईल याविषयी अनेकांच्या मनात साशंकता होती. आ पवार यांनी अवघ्या ६ दिवसांत म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी दुरुस्ती व देखभाल कामाचा शुभारंभ करवून घेतला. दुरुस्ती दरम्यान आलेल्या सगळ्या अडचणींवर मात करत २२ जानेवारी रोजी आ पवार यांच्या हस्ते कारखान्याचा अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न झाला आणि काल ९ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात गाळप सुरु झाले. आ पवार यांच्या प्रामाणिक तळमळीला डीडीआर फडणीस व नाईकवाडी यांनी तितकीच भक्कम साथ दिली आणि शासकीय भागभांडवल मंजूर झाल्यापासून रेकॉर्डब्रेक १११ दिवसांमध्ये अशक्यप्राय वाटणारा किल्लारी कारखाना प्रत्यक्षात सुरु झाला.