• Fri. May 2nd, 2025

लातूरच्या देशमुखांचा सिनेमाविश्वात डंका; ‘वेड’ चित्रपटानंतर लातूरच्या ‘ढिशक्यांव’ चित्रपटाची होतेय चर्चा

Byjantaadmin

Feb 9, 2023
लातूरच्या शेतकरी कुटुंबातील अहेमद देशमुख तसेच निर्माते उमेश मोहळकर ‘ढिशक्यांव’ चित्रपटामुळे गाजतायत राज्यात
लातूरच्या देशमुखांचा सिनेमाविश्वात डंका; ‘वेड’ चित्रपटानंतर लातूरच्या ‘ढिशक्यांव’ चित्रपटाची होतेय चर्चा
लातूर मधील शेतकऱ्याचा मुलगा अहेमद देशमुख हा मराठी सिनेविश्वात अंगी असलेल्या कला कौशल्यांच्या जोरावर ढिशक्यांव चित्रपटातून चमकदार काम करण्यास सज्ज झाला आहे. ग्रामीण भागातूनही एक चांगला कलाकार घडू शकतो हे अहेमदने दाखवून दिले. लातूर येथील शेतकरी कुटुंबात मोठा झालेला अहेमद स्वतःही शेतकरीच आहे. कलाकार होण्याची जिद्द अहेमदला शांत बसू देत नव्हती म्हणून जिद्दीला पेटून त्याने आपली आवड सत्यात उतरवली. आणि विशेष बाब म्हणजे सिनेविश्वात कुणीही गॉडफादर नसताना अहेमद स्वमेहनतीने इथवर पोहोचलाय, ही नक्कीच वाखाणण्याजोगी बाब आहे. आणि त्याच्या या मेहनतीचं फळ म्हणजे अहेमद ‘ढिशक्यांव’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकताना दिसतोय. याशिवाय चित्रपटाच्या निर्मितीत खारीचा वाटा असलेले निर्माते उमेश विठ्ठल मोहोळकर हे ही लातूरचेच आहेत.
अहेमद देशमुख सोबत या चित्रपटात प्रथमेश परब, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित हा चित्रपट असून महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ चित्रपट असून चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादाची धुरा लेखक संजय नवगिरे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे.
जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपला अभिनय आणि आवड सिद्ध करण्याचा प्रयत्न अभिनेता अहेमद देशमुख याने उत्तमरीत्या केला आहे. याबाबत बोलताना अहेमद असे म्हणाला की, “‘ढिशक्यांव’ चित्रपटाने माझं स्वप्न पूर्ण केलंय. शेतकरी कुटुंबातील मी सर्वसामान्य माणूस आहे. माझं सिनेविश्वात करियर करण्याचं स्वप्न माझ्यासह माझ्या कुटुंबीयांनीही उराशी बाळगल होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहण्यासाठी मी त्या स्वप्नाच्या मागे धावलो आणि आज इथवर तुमच्या समोर आलोय. माझा मायबाप रसिक प्रेक्षकवर्ग नक्कीच मला साथ देईल यांत शंकाच नाही. इतर कलाकारांप्रमाणे मला ही तुम्ही तितकंच प्रेम द्याल अशी आशा करतो, आणि येत्या १० फेब्रुवारीला जवळच्या सिनेमागृहात जाऊन चित्रपट नक्की पहा, हीच विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *