• Fri. May 2nd, 2025

माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Byjantaadmin

Feb 9, 2023

 

स्व. निलंगेकर यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निलंगा प्रतिनिधी :-आज निलंगा येथे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारक अनावरणाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत पार पडला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते तर उदघाटक म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते, तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील, माजी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी केले प्रास्ताविका मध्ये दादाच्या संपूर्ण जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आगामी काळामध्ये स्वर्गीय दादा साहेबांच्या विचारावर आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत आम्ही मार्गक्रमण करू आणि दादा साहेबांचा स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी त्यावेळी दिला.

आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणावेळी निळे जॅकेट व टोपी परिधान केली होती. स्वतः संभाजीराव पाटील यांन माझी आजी सुशिलाबाई निलंगेकर यांनी साहेबांचे निळे जॅकेट, टोपी दिली. ते परिधान करून आज पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करण्याची सूचना दिल्याचे सांगितले. संभाजीरावांनी भाषणावेळी निलंगेकरांचे जॅकेट, टोपी घातली होती.

जयंत पाटील यांनी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या प्रमुख पदावर असणाऱ्या लोकांनी कमीत कमी कशा पद्धतीने बोललं पाहिजे आम्ही डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून शिकलं संपूर्ण मराठवाड्याचा विकास डॉ निलंगेकर यांनी कसा केला त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले. देवेंद्रजी फडणवीस यांना मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी कसं जोडता येईल याची मागणी त्यांनी लावून धरली.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जीवन चरित्रावर ती बऱ्याच अनमोल गोष्टींना उजाळा दिला माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर जन्म पासून सुरुवात करत संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या धरणाची निर्मिती केली त्यांच्या चारित्र्य, निर्व्यस्नेपणा एकनिष्ठ आणि बाणेदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख ही रजाकारायच्या वेळी त्यांना होत असलेली अटक अशा विविध आठवणींना फडणवीस यांनी उजाळा दिला. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मराठवाड्याला व गोदावरी खोऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाणी जोडण्याचा आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण करू असे सांगितले महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवराच्या उपस्थित डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारकाचे अनावरण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *