• Fri. May 2nd, 2025

माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद, लवकरच त्याचे नाव सर्वांसमोर येईल-आमदार सातव

Byjantaadmin

Feb 9, 2023
आमदार प्रज्ञा सातव यांचा गंभीर आरोप:माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद, लवकरच त्याचे नाव सर्वांसमोर येईल

माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद असू शकते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे.

प्रज्ञा सातव यांच्यावर काल बुधवारी रात्री हिंगोली येथे हल्ला झाला. आरोपीने प्रज्ञा सातव यांना मागे खेचत त्यांच्या गालावर व पाठीवर चापटा मारल्या.

आरोपीला ओळखतही नाही

प्रज्ञा सातव यांनी प्रथमच या हल्ल्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. प्रज्ञा सातव म्हणाल्या की, माझ्यावरील हल्ल्यामागचे कारण संशयास्पद आहे. हल्लेखोराशी माझे कोणतेही वैमनस्य नव्हते. त्याला मी ओळखतही नाही. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे या हल्ल्यामागे एक मोठी शक्ती असू शकते. हल्लेखोराच्या पाठीमागे कोण आहे? हे समोर येईपर्यंत आमचे समाधान होऊ शकत नाही.

प्रज्ञा सातव म्हणाल्या, हल्लेखोरानेदेखील पोलिस तपासात स्वत:हून हल्ला केला नाही, असे सांगितले आहे. मला हल्ला करायला सांगितल्याच आरोपीने पोलिसांना सांगितल आहे. लवकरच आरोपीच्या मागे कोण आहे, हे समोर येई

हल्ल्याची दुसरी घटना

प्रज्ञा सातव यांनी सांगितले की, याआधी हिंगोलीत भारत जोडो यात्रा आली असतानाही पेडगाव येथे माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी आम्ही हल्ल्याला गांभीर्याने घेतले नाही. काही महिन्यातच हा दुसरा हल्ला माझ्यावर झाला आहे. आता शांत बसणे योग्य होणार नाही, असे समजूनच आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे.

हल्ला का झाला?

हल्ला का झाला असावा?, यावर प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात आम्ही पक्षाच काम पूर्ण ताकदीने करत आहोत. गावागावात फिरुन नागरिकांशी संवाद साधत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला घाबरवून घरी बसवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र, घाबरून घरी बसणाऱ्यांमधील मी नाही. आम्ही असेच काम करत राहणार आहोत.

पोलिसांच्या सतर्कतेच्या सूचना

प्रज्ञा सातव म्हणाल्या, माझ्यावर हल्ला झाला, यात पोलिसांची काहीही चूक नाही. माझ्यासोबत कायम एक महिला पोलिस असते. मात्र, आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन अचानक हे कृत्य केले. त्यात महिला पोलिसाची काहीही चूक नाही. हिंगोली पोलिस अधीक्षकांनी या हल्ल्यानंतर माझी सुरक्षा वाढवली आहे. तसेच, सर्व दक्षता घेऊन यापुढील कार्यक्रम करत जा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *