• Fri. May 2nd, 2025

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यात

Byjantaadmin

Feb 8, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यात

लातूर, दि. 08 (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. 9) लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत निलंगा येथे कर्मयोगी डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर स्मारकाचे अनावरण होणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनला लातूर विमानतळावर आगमन होईल व मोटारीने निलंगाकडे प्रयाण करतील. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे दुपारी तीन वाजता त्यांच्या उपस्थितीत कर्मयोगी डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर स्मारकाचे अनावरण होईल. दुपारी सव्वाचार वाजता उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस लातूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी सव्वापाच वाजता लातूर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *