• Thu. May 1st, 2025

जुन्या एमआयडीसी रोडवरील संथ गतीने होत असलेल्या ड्रेनेज च्या कामाची चौकशी करा – माजी नगरसेविका कांचन अजनीकर यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

Byjantaadmin

Feb 8, 2023

जुन्या एमआयडीसी रोडवरील संथ गतीने होत असलेल्या ड्रेनेज च्या कामाची चौकशी करा
– माजी नगरसेविका कांचन अजनीकर यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

लातूर :-शहरातील जुन्या एमआयडीसी रोडवर मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामाची चौकशी करून तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेविका कांचन रत्नदीप अजनीकर यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून बार्शी रोडवर जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरात येत असलेला जुना एमआयडीसी रोड गत दोन वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. शहरातील जुना रेणापूर नाका, इंडिया नगर, विक्रम नगर, सुभेदार रामजी नगर  यासह अंबेजोगाई रोडकडून एमआयडीसीकडे जाण्यासाठी असलेला एक पर्यायी व्यवस्था असलेला मार्ग म्हणून याचा वापर केला जातो, या रस्त्यावर नेहमीच वर्दळ राहते,परंतु या मार्गावर दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ड्रेनेज च्या कामांमुळे या रस्त्यावर असलेल्या व्यावसाययिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सततच्या कामांमुळे नेहमीच धूळ, फफुटयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून इतकेच नव्हे तर सदर मार्गाने रहदारी करणाऱ्या वाहचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या कामाच्या कालावधीची चौकशी करून हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी प्रभाग क्रमांक १० च्या माजी नगरसेविका कांचन  रत्नदीप अजनीकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *