महाराष्ट्रातील विदर्भातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे बारावीचे प्रात्यक्षिक पेपर सुरु आहेत आणि दुसरीकडे बारावीच्या एक विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. आजीकडे शिक्षणासाठी असलेल्या या तरुणीने असं का केलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वडिलांच्या निधनानंतर या तरुणीने आजीचं गाव गाठलं. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आजीकडे शिक्षणाचे धडे गिरवत होती. मात्र अचानक तिच्या एका निर्णयामुळे कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं.
‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ असा मेसेद पाठवून त्या तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास घेतला. सकाळी नात रुमच्या बाहेर का येतं नाही या चिंतेने खिडकीतून खोलीत बघितले…खोलीतील दृष्यं पाहून मावशी, आजीच्या पायाखालची जमीन सरकली.
तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील असं या मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. ती भंडारामधील तुमसरमध्ये आजीकडे राहत होती. तुमसरमधील हसारातील मातोश्री विद्या मंदिरात ती बारावी विज्ञान शाखेत शिकायला होती. तर तिची आई नागपूर जिल्ह्यातील कामठी इथे राहायची.
आयुष्यात कितीही अडचण असली तरी असं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नका. घरातील मोठ्या व्यक्तींशी संवाद साधा. आता बारावी आणि दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. आयुष्य एकदाच मिळतं. परीक्षा अनेक येतात, पुन्हा अभ्यास करु आपण यशाचं डोंगर गाठू शकतो पण अशाप्रकारे जीव संपवून घरच्यांना कायमचं दु:ख देणं हे योग्य नाही. कुठल्याही समस्येवर मृत्यू हा पर्याय नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. अडचणी येता संकट येतात पण त्यावर मात करणेही शक्य आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शिवाय पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांशी संवाद साधा. त्यांचा अडचणी समजून घ्या. त्यांचावर अभ्यासाचं टेन्शन देऊ नका.