द वर्ल्ड स्कूल इंडिया स्नेह संमेलन उत्साहात साजरे
निलंगा (प्रतिनिधी):-निलंगा येथील द वर्ल्ड स्कुल इंडिया शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले या स्नेह संमेलनात माँ तुझे सलाम या देशभक्तीपर गीतासह अनेक मराठी गीतावर चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
निलंगा शहरातील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह नगर पलिका येथे आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बिराजदार दत्तात्रेय जाधव सत्यवान भोसले परमेश्वर शिंदे निशांत देशपांडे सुरेश होळकर दत्तात्रेय पाटील कानेगाव राजेंद्रकुमार प्रा विश्वनाथ जाधव अदि मान्यवर उपस्थित होते.
हे स्नेह संमेलन यशस्वीकरण्यासाठी सुशील जाधव, करुणा जाधव, खादीन यास्मिन, हिना पटवारी, सोनाली इंडे, तांबोळी झेबा, वैष्णवी वाकोडे, गीता काळे, पल्लवी माळवतकर,अर्जुन शिंदे, साहेबराव शिंदे,परिश्रम घेतले.
नर्सरी पासून ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गीत नाटिका सादर केले प्रेक्षकांचा व उपस्थित पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.