लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीने
अल्पावधीत केलेली प्रगती कौतुकास्पद
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट
सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
लातूर प्रतिनिधी :लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीने अल्पावधीत केलेली प्रगती कौतुकास्पद असून या संस्थेच्या माध्यमातून लातूर शहर व जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायांना चालना मिळेल शिवाय राज्य पातळीवर संस्थेच्या शाखाचा विस्तार होईल, असा विश्वास यावेळी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या लातूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार देशमुख यांनी लातूर मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीच्या दशकपूर्ती महोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोइज शेख, सचिव अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, डी.एन. शेळके, समद पटेल, अभिजीत देशमुख, लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जे.जी सगरे, चेअरमन इसरार सगरे, टवेन्टिवन शुगर ली.चे व्हा.चेअरमन विजय देशमुख, व्हा.चेअरमन रवींद्र काळे, विजय निटुरे,चांदपाशा इनामदार, प्रभाकर बंडगर, दगडूसाहेब पडीले, चंद्रकांत धायगुडे,रामदास पवार, सचिन दाताळ, सोनू डगवाले, विष्णुदास धायगुडे, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी लातूर मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीचे सर्व अधिकारी कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, देशमुख व सगरे कुटुंबीयांचा अनेक वर्षापासून स्नेह आहे. सहकार शिक्षण व्यापार क्षेत्रात या कुटुंबीयांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आमच्या त्यांच्या सोबतच्या अनेक जुन्या आठवणी आहेत. सगरे कुटुंबीयांच्या विधायक कामाला आमचा कायम पाठिंबा राहीला आहे असे सांगितले. पूढे बोलतांना ते म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ऊस व साखर उत्पादनात लातूर जिल्ह्याने जागतिक विक्रम केला, कडधान्य प्रक्रीया, ऊस साखर आधी उद्योगामुळे लातूरचा चौफेर विकास झाला आहे. एका अर्थाने लातूरच्या जीडीपीत वाढ झाली आहे, हे सर्व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दृष्टिकोनामुळे शक्य झाले आहे. आज लातूरच्या शेजारच्या जिल्ह्याची चर्चा न होता लातूरची चर्चा होते. विलास सहकारी साखर कारखाना युनिट १ व २ ला उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात व्यापार व्यवसायासाठी योग्य वातावरण टिकवण्याचे काम झाले. लोकनेते विलासराव देशमुख यांनी मला शिकवले की लातूरच्या बाबतीत तडजोड करायची नाही. शिक्षण, व्यापार, उद्योग, कायदा व सुव्यवस्था लातूर शहरात उत्तम आहे. लातूर मल्टीस्टेट क्रेडिट को. ऑफ सोसायटीने १ कोटी ठेवी पासून सुरुवात करून १०० कोटीच्या पुढे ठेवी या संस्थेने निर्माण केले आहे कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, सेना भाजप सरकार जनतेला पटलेल नाही. सरकारचा निर्णय कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टही लवकरच निर्णयही देत नाही, याबद्दल आमदार देशमुख यांनी खंत व्यक्त करून लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जे.जी सगरे व चेअरमन इसरार सगरे यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, लातूर क्रेडिट सोसायटी संस्थापक अध्यक्ष जे.जी. सगरे, माजी आमदार पाशा पटेल आदींनी आपले मनोगत व्यक्त करून लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन इसरार सगरे यांनी करून क्रेडिट सोसायटीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुळ व तनुजा शिंदे यांनी केले तर शेवटी आभार पी.एन बंडगर यांनी मानले.