माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या बिनविरोध निवड झालेल्या
नूतन संचालक मंडळाची भेट घेऊन सर्वांचे अभिनंदन केले
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर येथील विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या बिनविरोध निवड झालेल्या नूतन संचालक मंडळाची एकत्रित भेट घेऊन सर्वांचे अभिनंदन केले, आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.नव्याने निवड झालेल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ व जलद सेवा देणारी बॅक म्हणून विलास को-ऑपरेटिव बँकेचा लौकिक होईल, लातूर जिल्ह्याबरोबरच मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात या बँकेच्या शाखा स्थापन केल्या जातील. सर्वसामान्य माणसालाही व्यावसायिक आणि उद्योजक बनवण्यासाठी ही बँक सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देईल असा विश्वास यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. या प्रसंगी संचालक सर्वरी ॲड. किरण शेषेराव जाधव, ॲड. समद रज्जाक पटेल, अनिल बाबाराव शिंदे, सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे, व्यकंटेश विश्वाभरराव पुरी, विजय गोविंदराव देशमुख, अरूण लक्ष्मणराव कामदार, अजय ललीतकूमार शहा, डॉ. कल्याण बलभीम बरमदे, उस्ताद सलीम ताज्जमूलहूसेन, प्रा.स्मिता कैलास खानापूरे, डॉ.प्रा.जयदेवी पांडूरंग कोळगे, चंद्रकांत लिंबराज धायगूडे, सुनिल नामदेवराव पडीले, पंडीत कोडींबा कावळे आदी उपस्थित होते.