निलंगा येथे बुधवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
निलंगा:- महाराष्ट्राचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती व पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने निलंगा येथील कुडुंबले हॉस्पिटल च्या वतीने बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मोफत आरोग्य तपासणी , सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कै. डॉ. मल्लिकार्जुन कुडुंबले यांच्या निलंगा येथील कुडुंबले हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टराकडून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग ,दमा, अस्थमा, ॲलर्जी, लठ्ठपणा, थायरॉईड, छातीचे विकार ,न्योमोनिया, संधिवात, वातरोग, लिव्हर, वृध्दापकाळातील त्रास, मेंदूज्वर, लकवा, महिलांची अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व तपासणी, प्रसुतीपूर्व आणि प्रसूती पश्चात आजारांवर मोफत उपचार , तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात रुग्णांच्या गरजेनुसार ईसीजी, रक्त व लघवीची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. बुधवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत
कुडुंबले हॉस्पिटल
शिवाजी नगर निलंगा येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.विक्रम कुडुंबले, डॉ.प्रियंका कुडुंबले, डॉ.साईनाथ कुडुंबले , डॉ.सुधा कुडुंबले , सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ.एस.एस.पाटील आदींनी केले आहे.