निलंगेकरांच्या हस्ते पुजनाने सभामंडपाच्या कामाची सुरुवात
निलंगा :-महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील माजी मुख्यमंञी कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारक अनावरण सोहळ्याच्या सभामंडपाच्या कामाची सुरुवात आज माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर,प्राचार्य भागवत पौळ, दिलीप धुमाळ,प्राचार्य कोलपुके सर, प्रशांत गायकवाड, सुरेंद्र धुमाळ, भरत गोरे आदींची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंञी कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण सोहळ्यासाठी गुरूवार दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी असणार आहे.
राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते व लातूर जिल्हयाचे भाग्यविधाते कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणारे माजी मुख्यमंञी अष्टपैलू व्यक्तिमहत्त्व स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृृृहमंञी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते हेणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंञी सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंञी अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकुर आदीसह राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्मारक समिती ने केले आहेत.