• Wed. Jun 18th, 2025

जिल्हा परिषद सुशोभित गार्डनमधील लोकनेते विलासराव देशमुख  यांच्या पुतळ्यास दिलीपराव देशमुख यांनी केले अभिवादन

Byjantaadmin

Feb 4, 2023

जिल्हा परिषद सुशोभित गार्डनमधील लोकनेते विलासराव देशमुख  यांच्या पुतळ्यास दिलीपराव देशमुख यांनी केले अभिवादन

लातूर जिल्हा परीषदेला दिली सदिच्छा भेट

पुतळा व सुशोभित गार्डन परिसराची केली पाहणी

लातूर :-ग्रामीण भागातील विकासाला दिशा देण्याचे कार्य करत राज्याला विकासाच्या मार्गावर घेवुन जाणारे ज्यांची ओळख महाराष्ट्रातील चांद्या पासून बांध्यापर्यंत असणारे एक विकासभीमुख नेतृत्व जाणता राजा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्हा परिषदमधील सुशोभित गार्डन मधील पूर्णाकृती पुतळ्याची शुक्रवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी पाहणी केली पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान पुतळा परिसराची पाहणी करून सुशोभित केलेल्या कार्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी कौतुक केले

लोकनेते विलासराव देशमुख  यांचा हा पुर्णाकृती पुतळा हा ग्रामीण भागातील लोकांना विकासाचा मार्ग दाखवणारा आहे कारण इथे मिनी मंत्रालय मध्ये येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकनेते विलासराव देशमुख यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढें जात नाही आजही लोक सकाळीं भल्या पहाटे दररोज इथे मॉर्निंग वॉक करताना अगोदर इथे येवून त्यांचे दर्शन घेतात त्यानंतरच मॉर्निंग वॉकिंग सुरु होते हे चित्र दररोज पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत बघायला मिळत असते

माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांची जिल्हा परिषद येथे भेट

पुतळा परिसराची पाहणी अभिवादन झाल्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा परिषद कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळीं त्यांचा जिल्हा परिषद चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी सत्कार केला याप्रसंगी दिलीपराव देशमुख साहेब यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली

याप्रसंगी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील, वीलास साखर कारखान्याचे संचालक गोविंद डुरे पाटील, बारबोले, बाळासाहेब जाधव, डॉ पी पी शहा, जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *