• Tue. Apr 29th, 2025

अदानींचे शेअर्स 9 दिवसांत 70 % कोसळले- अदानींची वीज महाग; US शेअर बाजारातून अदानींना बाहेरचा रस्ता

Byjantaadmin

Feb 3, 2023

अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी गुरुवारीही विरोधकांनी संसद दणाणून सोडली होती.

दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल 35% ची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत 1000 रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर जवळपास 3500वर होता. अशा प्रकारे मागील 9 दिवसांत कंपनीचे शेअर्स 70%नी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या डाउ जोंस स्टॉक एक्सचेंजने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दुसरीकडे, बांगलादेश सरकारने अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही या प्रकरणी 6 फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.

  • काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद परिसरात या प्रकरणी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यात काँग्रेस, TMC, आम आदमी पार्टी (AAP), सपा, DMK, जनता दल व डाव्यांसह 13 पक्ष सहभागी होतील असा अंदाज आहे.
  • काँग्रेस सरचिटमीस के सी वेणुगोपाल म्हणाले की, पक्ष कार्यकर्ते या प्रकरणी 6 फेब्रुवारी रोजी देशभरातील जिल्ह्यांतील LIC व SBI कार्यालयांपुढे निदर्शने करतील. शेअर बाजारातील हा अमृतकाळ आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
  • अदानींच्या 3 शेअर्सवर NSEची नजर

    NSEने अदानी समूहाच्या 3 शेअर्सना अल्पमुदतीसाठी अ‍ॅडिश्नल सर्व्हिलांस मेजर्सच्या (ASM) यादीत टाकले आहे. यात अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायझेस व अंबुजा सिमेंटचा समावेश आहे. ASM निगराणीची एक विशेष पद्धत असते. त्या माध्यमातून मार्केटच्या रेग्युलेटर सेबी व मार्केट एक्सचेंज BSE, NSE त्यावर नजर ठेवते. याचे उद्दीष्ट गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्याचे असते. एखाद्या शेअरमध्ये चढ-उतार होत असल्यास त्याला NSEमध्ये टाकले जाते

  • फोर्ब्सच्या यादीत 17 व्या क्रमांकावर घसरण

    हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे मार्केट कॅप 8.38 लाख कोटींनी घसरले आहे. यामुळे गुरूवारी अदानींची फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीत 17 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed