कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण सोहळा
फडणवीस, चाकूरकर, दानवे, शिंदे, पाटील यांची उपस्थिती
निलंगा :-राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते व लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते कर्मयोगी डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर स्मारकाचा अनावरण सोहळा येत्या गुरुवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित केला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, जनसेवा आणि विकासाचा ध्यास असणारे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. सहधर्मचारिणी श्रीमती सुशिलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री संजय बनसोडे, आ. रमेश कराड, आ. बाबासाहेब पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. धिरज देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार दिनकर माने, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी आमदार मनोहर पटवारी, माजी आमदार टी.पी. कांबळे, माजी आमदार राम गुंडीले, माजी आमदार रामचंद्र नावंदीकर, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर,
धर्माजी सोनकवडे, माजीआमदार वैजीनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे माजी आमदार सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे,. अशी विनंती श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर, डॉ. सौ. चंद्रकला अरुण डावळे, डॉ. शरद पाटील निलंगेकर, अशोक पाटील निलंगेकर, विजय पाटील निलंगेकर, आ. संभाजी पाटील निलंगेकर आणि कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक समिती निलंगा यांनी केली आहे.