फार्मसी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
निलंगा:-महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत निलंग्याच्या महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३१ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. महाराष्ट्र तंत्रनिकेतन महाविद्यालयाची स्थापना १९८१ साली झाली. महाविद्यालत दरवर्षी एक बॕचचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो. यावर्षी २००७ चे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.
मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली महावाद्यालय कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी असलेले व सद्या प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ भागवत पौळ , डॉ सिध्देश्वर पाटील उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित होते.
जावेद शेख, सिनियर मॕनेजर ब्रिस्टल लॕब लंडन , पवार भास्कर सहा प्राध्यापक स्वा रा ती म , नांदेड, शरद खाडे, रमेश माहोते, सोनार सोनाली, रजपूत नारायणसिंग, रावजी पवार, मल्लिनाथ अकिले, प्रदिप आर्य, साळुंखे विकास, येलगुलवार सचीन, अमोल गायके, रमाकांत या मादळे, सतिश भालेकर, विनायक सुर्यकर, धोंडदेव कुलकर्णी श्याम, संदिप लांडगे, या विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्वांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भागवत पौळ म्हणाले की, ‘या मेळाव्याच्या अयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात व्यवसाय व नोकरी करण्यासाठी माजी विद्यार्थींची मदत होईल असे ते म्हणाले
तसेच या मेळाव्याचे आयोजन आणि माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यामागील हेतु स्पष्ट केला.
या वेळी माजी विद्यार्थी जावेद शेख , राजपूत नारायणसिंग, रमाकांत मादळे, भास्कर पवार , रावजी पवार आदि माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात अनेकांनी आर्थिक देणीही दिली. या कार्यक्रमासाठी अविनाश मुळदकर, डॉ संजय दुधमल, विलास कारभारी, डॉ चंद्रकांत ठाकरे, डॉ अमोल घोडके, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी फार्मसी अंतीम वर्षातील विद्यार्थीनी जळकोटे रुतुजा, व जाधव जयश्री व कार्यक्रमाची सांगता सय्यद रिजवान यांनी केली. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी अक्षय जाधव, माने, पोतराजे विशाल, संतोष गवळी, वैभव शिरुरे यांनी परिश्रम घेतले.