कासार सिरसी येथे दोन किराणा दुकानांतून 2 लाखांचा गुटखा जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल
कासार सिरसी;-निलंगा तालुक्यातील मौजे कासार सिरसी येथील दोन किराणा दुकानांमधून तब्बल 2 लाख 98 हजार 930 रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी अंगद रघुनाथ कोतवाल यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे की, बाबू वायरली तांबोळी यांच्या ए-वन किराणा स्टोअर्समध्ये ठेवण्यात आलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी पान मसाला गुटखा, असा 1 लाख 82 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध कासार सिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माधव लक्ष्मण बिलापट्टे स्थानिक गुन्हा शाखा पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश शिवरावे यांच्या कोराळी रोडवरील स्वप्निल किराणा स्टोअर्समधून वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधित पान मसाला गुटखा असा 1 लाख 16 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक डमाळे हे करत आहेत.