• Tue. Apr 29th, 2025

विक्रम काळे चौकार मारणार की, परिवर्तन होणार? मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात

Byjantaadmin

Feb 2, 2023

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या इमारतीत ही मतमोजणी होत आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले असून, 700 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. तर मतमोजणी केंद्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि भाजप उमेदवार किरण पाटील दोन्ही दाखल झाले असून, त्यांनी एकेमकांना शुभेच्छा देखील दिल्या आहे. त्यामुळे गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे काळे यावेळी चौकार मारणार की, भाजप परिवर्तन घडवून आणणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात असून, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. विभागात 61 हजार 529 शिक्षक मतदारांपैकी 53 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत उमेदवार संख्या आणि मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे आजचा येणारा निकाल महत्वाचा समजला जात आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या परिसरात प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले आहेत. प्रारंभी स्ट्रॉगरूममधून मतपेट्या मतमोजणी स्थळी आणण्यात आल्या. त्यानंतर मतपेट्यांतील मतांची मोजणी करण्यात येत आहे. मतांच्या प्रारंभिक मोजणीला किमान चार तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही मोजणी किमान 3 ते 4 तासांत पूर्ण होऊन पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

उमेदवारांनी दिल्या एकेमकांना शुभेच्छा….

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी होणार असल्याने काही उमेदवार मतमोजणी केंद्रावर आधीच दाखल झाले होते. उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचवेळी मतमोजणी केंद्रावर आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि किरण पाटील दोघांनी एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे गेल्यावेळी किरण पाटील यांनी विक्रम काळे यांचा प्रचार करत त्यांचा विजयात वाटा उचलला होता. मात्र यावेळी तेच किरण पाटील भाजपकडून रिंगणात असून, विक्रम काळे यांना त्यांनी आव्हान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed