ट्रक आणि कारचा अपघात दोन जागीच ठार:
आईच्या तेराव्याला येत असताना घडली दुर्दैवी घटना
निलंगा/प्रतिनिधी
ट्रक आणि कारच्या धडकेत दोन जागीच ठार तर चारजन गंभीर जखमी झाल्याची घटना हैद्राबाद जवळ राजेंद्र नगर येथील बायपास रोडवर घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील बसपूर येथील व्यंकट काळगे वय ४५ वर्षे,जखमी ,पत्नी जयश्री व्यंकट काळगे वय ४० वर्षे मयत ,भाऊ मेव्हना सतिश भानुदास साळुंके,वय ५० रा.शिऊर ता.निलंगा जखमी, जखमी,मुलगी श्रेया व्यंकट काळगे वय ७ वर्षे जखमी ,विराट व्यंकट काळगे वय १२ वर्षे,आणि कार ड्रायव्हर मुस्तफा गनी शेख वय ३८ वर्षे रा.शिऊर ता.निलंगा हे सर्वजन दिनांक ३१ रोजी हैद्राबाद येथील विमानतळावरून गावाकडे निघाले होते. हैद्राबाद राजेंद्रनगर येथील बायपासवर रोडवर क्रमांक एचआर १० एसी.१९८३ या कारच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पुढे जाणारा ट्रक क्रमांक डिएन ओ ९ आर ९२९० या गाडीला सांयकाळी ६ वाजता पाठीमागून जोराची धडक दिल्याने कारचा ड्रायव्हर मुस्तफा गनी शेख वय ३८ व जयश्री व्यंकट वय ४० हे दोघेजन जागीच ठार झाले असून व्यंकट काळगे,सतिश साळुंके,श्रेया काळगे,विराट काळगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हैद्राबाद येथे आर्मी हाॕस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत.
व्यंकट काळगे हे विशाखापट्टनम येथे भारतीय सैन्यात आहेत.त्यांचा संपूर्ण परीवार हा विशाखापट्टम येथे राहत होता. त्यांच्या आईचे गेल्या दहा दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले असून ते संपूर्ण परीवारासह विशाखा पट्टनम येथून विमानाने हैद्राबाद येथे आले होते. शिऊर येथील कार त्यानी भाड्याने मागवून घेतली होती.आईच्या तेराव्याला निलंगा तालुक्यातील बसपूर येथे येत असताना घडली दुर्दैवी घटना…
अपघातात मयत झालेल्या जयश्री काळगे यांच्यावर माहेरी शिऊर येथे करण्यात आले अंत्यसंस्कार व कार ड्रायव्हर मुस्तफा शेख यांच्यावरही शिऊर येथे अंत्य संस्कार करण्यात आले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.