शिवसेनेचा वाघ अविनाश रेशमे
नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व व कायम समाजसेवेचा वसा घेतलेले वडील लिंबन महाराज रेशमे यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणाला समाजकारणाची जोड देत सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणारे मनमिळावू व दिलदार नेतृत्व अविनाश रेशमे यांच्या रूपाने निलंग्याच्या राजकारणात पाहायला मिळते.
गेल्या ४० वर्षांपासून जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे कुटुंब म्हणून लिंबन महाराज रेशमे कुटुंबीयांची ओळख आहे. दानशूर पित्याच्या पोटी जन्मलेले युवा नेते अविनाश रेशमे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना निलंग्यात महिला मेळाव्याला आणून खरी राजकारणाची सुरुवात केली. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी निलंग्याचे उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काम जिल्हाभर पसरवले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ऐनवेळी रेशमे यांना तिकीट न देता दुसरा उमेदवार दिला. तरी खचून न जाता त्यांनी जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर अपक्ष निवडणूक लढविली. यांच्या प्रचारात अविनाशदादांनी सारा मतदारसंघ ढवळून काढला. त्या निवडणुकीमध्ये क्रमांक ३ ची मते पडली. त्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अविनाश रेशमे यानी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला हत्तीचे बळ मिळाले. मतदारसंघात नवीन जुने शिवसैनिक व कार्यकर्ते यांची मोट बांधून शिवसेनेचा भगवा घराघरात पोहोचण्यासाठी शिरूर अनंतपाळ, देवणी नगरपंचायत व निलंगा, औराद शहाजानी बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढवली. निलंगा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढविण्यात रेशमे यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाच्या वाटयाला गेला. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले आणि काही अपक्ष निवडणूक लढवावी म्हणून मागणी केली. परंतु दादांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांचा मेळावा घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला आदेश आपल्यासाठी सर्वस्वी असून पक्षासोबत गद्दारी करायची नाही, असे आदेश कार्यकत्यांना देत निलंगा आणि औसा मतदार संघातून युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून मनाचा मोठेपणा
दाखवला. अविनाश दादा रेशमे यांचे मतदारसंघात काम पाहून शिवसेनेचे नेते, मराठवाडा संपर्क प्रमुख मा. चंद्रकांत खैरे यांनी अविनाश दादा रेशमे यांना निलंगा शिवसेना तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली. या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निलंगा मतदारसंघांमध्ये जवळपास ३० ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा अविनाशदादा यांच्या नेतृत्वाखाली फडकवला. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आले. आतापर्यंतच्या काळामध्ये शिवसेनेला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य नव्हते. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भरीव कामगिरी केली आहे. दादांच्या कार्याचा लेख असाच वाढत जावो, ही वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा! मतदार
– प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, शिवसैनिक निलंगा,
(Add)