महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी पुकारलेल्या अंदोलनास पाठिंबा
दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा जिल्हा लातूर येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राज्य महासंघाच्या आदेशानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या
1) सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करणे. 2)10,20,30 लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांना लागू करणे. 3) 1 जानेवारी 2016 ते 31 आक्टोंबर 2020 अखेरची प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या दरम्यानची फरकाची थकबाकी अदा करणे व 1410 विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करणे,
4) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे,
5) 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,
6) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोग लागू करणे.
या प्रमूख मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने शासनाच्या विरोधात 1)दिनांक 02 फेब्रुवारी 2023 पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परिक्षांच्या कामकाजावर बहिष्कार,
2) दिनांक14 फेब्रुवारी2023 रोजी दुपारी 2.00 ते 2.30 अवकाश काळात निदर्शने,
3) दिनांक15 फेब्रुवारी2023 रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे,
4) दिनांक 16 फेब्रुवारी2023 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप.
5) दिनांक 20 फेब्रुवारी2023 पासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद.
वरिल टप्प्या टप्याने होऊ घातलेल्या व पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात व संपात सहभागी होत असल्याचे निवेदन महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके यांना सादर करण्यात आले.
यावेळी निवेदन सादर करताना महाविद्यालयाचे मुख्य लिपीक श्री पवन पाटील,
माने दत्तात्रय जी., जाधव ए. व्ही. , लोंढे आर. बी., बोळे टी. पी., देशमुख व्ही.जे. संतोष तोरसल्ले, नामदेव गाडीवान, सोनकांबळे सुरेश, शिंदे महादू, सुरवसे प्रकाश, वाकळे जी. व्ही. , इ.कर्मचारी उपस्थित होते.