युवक हेच परीवर्तनाचे खरे माध्यम आहेत- दिनेशकुमार कोल्हे
निलंगा: युवकांनी आयुष्यामध्ये ध्येय निश्चीत केले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक आहे, क्षमतेनुसार ध्येय्य ठरवावे, ध्येय्य प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसू नये. प्रामाणिक कष्ट केल्यास निश्चीतच आपल्याला यश प्राप्त होईल. युवकांनी आपली क्षमता व्यसनांमध्ये खर्च करू न करता स्वतःचे, कुटुंबाचे, गावाचे, समाजाच्या व देशाच्या परिवर्तनात मोलाचे योगदान द्यावेत. राष्ट्रीय सेवा योजना हे युवकांमध्ये परीवर्तनशिलता निर्माण करण्याचे काम करते.युवकांना विधायक संघटनात्मक दृष्टिकोन अशा शिबिरांमधून प्राप्त होतो. असे मत निलंगा येथील पोलीस उप अधिक्षक दिनेशकुमार कोल्हे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रिय सेवा योजना शिबिरातील समारोप समारंभात बोलत होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहीजे आणि ध्येयवादी बनले पाहीजे असेही मत प्रतीपादन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मौजे जाजनूर येथे आयोजीत करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप समारंभाचे प्रमूख पाहूणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना अशा प्रकारचे शिबिर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महत्वाचे असतात. विद्यार्थीना विधायक दिशा द्यायचे काम शिबिराच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर गावाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देण्याचे कामही यातून होते असे मत याप्रसंगी व्यक्त केले. या समारोप समारंभासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, मराठी विभाग प्रमूख डॉ. भास्कर गायकवाड, मौजे जाजनूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री काशीनाथ गोमसाळे, विनायकराव गोमसाळे, चेअरमन अरविंद पाटील, श्री अरविंद गुऱ्हाळे, यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच श्री बालाजी गोमसाळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने शिबिरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतूक करून मौजे जाजनूर येथे हे शिबिर आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी जाधव ओमकार, काळे प्रसाद, सय्यद खदीर या शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.
या समारोप समारंभाचे प्रास्ताविक डॉ. विठ्ठल सांडूर यांनी तर शिबिर कालावधीत घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा डॉ. सुभाष बेंजलवार यांनी घेतला. सूत्रसंचालन शिबिरार्थी शकिल शेख यांनी केले. तर आभार प्रा. विश्वनाथ जाधव यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. विश्वनाथ जाधव, श्री उमाजी तोरकड, ए. एस. शेख मौजे जाजनूरचे सरपंच,श्री काशीनाथ गोमसाळे व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.