करवंदी येथील जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या चित्तथराक कवायती
करवंदी, ता: उदगीर, येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्रजासत्तादिनानिमित्त लेझिम आणि चित्तथरारक कवायती सादर केल्या.
जि. प.प्राथमिक शाळा करवंदी चे मुख्याध्यापक एस.एल शेगसारे ,शिक्षक डी. व्ही.शिंदे,एल.व्ही.मोरे,डी. जी.तोंडारकर यांनी यासाठी विशेष मेहनत करून घेतली , त्यांनी विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी , मराठी व इंग्रजी भाषण स्पर्धा, वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा, संविधान- प्रार्थना वाचन, दररोज चे दिनविशेष, नित्य पाठ इत्यादी शाळेतील मुलांकडून दररोज करून घेतात. त्याबद्दल सर्व गावातील लोकांनी त्यांचे विशेष आभार मांडले.
यावेळी सरपंच कौशल्या भाऊराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .त्या वेळी गावातील भालेराव भाऊराव जाधव, डॉ. दयानंद जाधव , ग्रा. पंचायत सदस्य सुग्रीव सूर्यवंशी, माजी सरपंच गंगाधर बिरादार, विजयकुमार चव्हाण , परमेश्वर गायकवाड, ग्रा. सदस्य विनायक गायकवाड , तंटा मुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, संकट सूर्यवंशी, संदीपान सूर्यवंशी, बाळासाहेब जाधव, अजित जाधव, वेंकटराव बिरादार, साहेबा वाघे, राम वाघे , काशिनाथ पाटील, शालेय समिती पालक अध्यक्ष शिवा गुणगुणे, संदीप जाधव , ग्राम पंचायत सदस्य शालुबाई नरवटे, उपसरपंच शाहू चव्हाण, रमाबाई सुर्यवंशी, शंकर बिरादार, वसंत सुर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, आंगणवाडी शिक्षिका नांदेडकर, नरवटे, पूनम जाधव, ग्रा. पंचायत सदस्य मारोती नरवटे, रोहिदास गंभीरे,अनिल भातंब्रे, पद्मिन बाई वाघे,बाके,पापड सूर्यवंशी, पांडूरंग बिरादार, मोहन बिरादार, तुकाराम कदम, विजयकुमार जाधव , सचिन पाटील, नागनाथ बाके, मच्छिंद्र गायकवाड, चंद्रभान सुर्यवंशी , विजय मेहत्रे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोत्साहन पर वेगवेगळ्या खेळात , स्पर्धेत प्रथम, द्वतीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले.