• Tue. Apr 29th, 2025

ब्राईट‌ स्टार हायस्कूल उदगीर येथे नवरात्रीनिमित कार्यक्रम

Byjantaadmin

Oct 1, 2022

उदगीर:-ब्राईट‌ स्टार हायस्कूल उदगीर येथे नवरात्रीनिमित दि. 30 सप्टेंबर रोजी कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया नाईट आयोजीत करण्यात आली होती, माजी मंत्री  आ. संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी प्रा.विरभद्र  घाळे अध्यक्ष,विश्वशांती शिक्षण संस्था उदगीर प्रा. सौ प्रेमा वि घाळे ,सचीव,विश्वशांती शिक्षण संस्था, डाॅ भाग्यश्री घाळे यांनी शक्तीस्वरूप कुमारिकांचे पुजन‌ केले.यावेळी मा उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,रा.कां.शहराध्यक्ष समीर शेख,लॉ विवेक जैन, लॉ योगेश चिद्रेवार,राहूलभैय्या सोनवणे,कुणाल भैय्या बागबंदे शिक्षिका सौ रजनीपुदाले,सौ सुचिता बिरादार,सौ सोनाळे,सौ तरोडे,सौ संकाये,सौ माया सौ‌पुजा व परिसरातील हजारहून अधिक महिलाभगिनी उत्साहाने उपस्थित होते. गत 12 वर्षांपासून ब्राईट‌स्टार हायस्कूल मध्ये होणाऱ्या कुमारी पुजन व दांडिया महोत्सवाचे साहेबांनी कौतुक केले व‌ फक्त शैक्षणीक क्षेत्रच नाही तर ब्राईट‌ स्टार पॅटर्न सांस्कृतीक क्षेत्रात ही सर्वात पुढे असल्याचे आनंद व्यक्त केले.सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याने उत्कृष्ट असा आनंदसोहळा सर्वांना अनुभवता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed