औराद शा. येथे माेटार सायकलचा समाेरा समाेर अपघातात दाेन ठार दाेन जखमी
निलंगा ( प्रतिनिधी ) लातुर जहिराबाद महार्गावरील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या पुलावर सांयकाळी 6 च्या दरम्यान माेटार सायकल क्र एम एच 24 आर 4719 व एम एच 14 E T 6758 या दाेन माेटार सायकल चालकांची समाेरा समाेर जाेरदार धडक बसली हा अपघात झाला . यात दाेन्ही माेटार सायकल वरुन चाैघे जन उडुन दुरवर फेकले गेले . यात दाेघांचा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच मृत्यू झाले . तर एक गंभीर जखमी झाला असुन चाैथा किरकोळ जखमी झाला आहे या जखमीना औराद पाेलिसांनी हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातात सूर्यकांत हाणमंत खांडेकर वय 65 वर्षे व अशाेक गुणवंतराव काेळेकर पाटील वय 52 वर्षे रा केसरजवळगा ता भालकी यांचा जागीच मृत्यू झाला आहे हे दाेघे लातुरहुन आपल्या गावाकडे केसरजवळगा येथे जात हाेते तर साेमपुर ता भालकी येथील सतिश तानाजी बिरादार वय 29 वर्षे व मुकेश छञुगन बिरादार हे दाेघे माेटार सायकलने तुळजापूर देवी दर्शनासाठी जात हाेत हे दाेघे जखमी झाले आहेत यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती औराद पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे दिली .