रेणा कारखाना येथे शेतकी कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहनांचे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते वाटप
दिलीप नगर (निवाडा) :– रेणा सहकारी साखर कारखाना येथे माजी मंत्री तथा रेणा कारखाना संस्थापक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,संतशिरोमणी कारखाना व्हा.चेअरमन शाम भोसले,पंडीतराव माने,मांजरा कारखाना संचालक ज्ञानेश्वर भिसे, सचिन दाताळ, संग्राम माटेकर, प्रविण पाटील, तानाजी कांबळे, सतीश पाटील, स्नेहलराव देशमुख, युनीकाॅर्न मोटार सायकल कंपनीचे प्रतिनिधी रवि जाधव, कार्यकारी संचालक बी. व्ही मोरे, मुख्य शेतकी अधिकारी एस. एस. भोसले, आदींची उपस्थिती होती.
रेणा कारखाना यशस्वी वाटचालीत सर्व कामगार व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना योग्य सुविधा पुरविणे हे कर्तव्य संचालक मंडळाचे असून तसा प्रयत्न नेहमीच आमचा राहीला असून समन्वयातून शेतकरी सभासदांची उन्नती साधण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची भावना यावेळी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी व्यक्त केली.