• Wed. Apr 30th, 2025

शिक्षकांवर अन्‍याय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत मागण्‍याचा नैतिक अधिकार नाही- पालकमंत्री गिरीष महाजन

Byjantaadmin

Jan 28, 2023

शिक्षकांवर अन्‍याय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत मागण्‍याचा नैतिक अधिकार नाही- पालकमंत्री गिरीष महाजन

किरण पाटील यांच्‍या प्रचारार्थ मेळाव्‍यात घणाघाती टि‍का

 

लातूर प्रतिनिधी:- ज्ञानदान होणाऱ्या पवित्र शिक्षण क्षेत्राचा वापर केवळ राजकारणासाठी कॉग्रेस आणि राष्‍ट्रवादी केला आहे. गुरूजनांना शिक्षण सेवक हे पद कॉंग्रेस राष्‍ट्रवादीनेच दिलेले असुन शिक्षकांच्‍या पेन्‍शन योजनेसह विनाअुदानित शाळेचा प्रश्‍न त्‍यांचाच काळात प्रलंबित राहिला होता. शिक्षण क्षेत्राचे वाटोळे केले निवडणुकीच्‍या निमित्‍ताने त्‍यांच्‍याकडुन त्‍यांचे प्रश्‍न सोडविले जावेत अशी ओरड होवू लागली आहे. शिक्षकांवर अन्‍याय करणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान मागण्‍याचा नैतिक अधिकारी नाही अशी घणाघाती टिका राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्‍हयाचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे.
लातूर येथे छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्‍या प्रचारार्थ आयोजित संस्‍थाचालक व शिक्षकांच्‍या मेळाव्‍यात पालकमंत्री महाजन बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशआप्पा कराड, खा. सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्‍यू पवार, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आ आमदार गोविंदण्णा केंद्रे, शिवाजीराव पाटील तळेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्‍य शैलेश लाहोटी, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, दिग्विजय काथवटे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाराष्ट्रासह देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारक बदल होवू लागलेले असुन ज्‍याच्‍याकडुन भावी पिढी घडविण्‍याचे काम होवून देशाचे भविष्‍य अधिक उज्‍वल होत आहे. त्‍या शिक्षकांचा मानसन्‍मान वाढविण्‍याचे काम होत असल्‍याचे सांगून पालकमंत्री गिरीष महाजन म्‍हणाले की, देशाला महासत्‍ता बनविण्‍यात शिक्षकांचे मोठे योगदान लाभत आहे त्‍या शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील राज्‍य सरकार बाधिल असल्‍याचा विश्‍वास दिला.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्याबाबत कधीच पक्षीय व राजकीय मतभेद केला जाणार नाही असे सांगून शिक्षणाचा दर्जा वाढविण्‍यासाठी आणि प्रत्‍येकाला शिक्षण मिळावे याकरीता राज्‍य सरकार प्रयत्‍नशील आहे. मात्र हे प्रयत्‍न होत असताना शिक्षकांनाही त्‍यांचा सन्‍मान मिळावा आणि त्‍यांचे प्रश्‍न सुटले जावेत याकरीता राज्‍य सरकारच्‍या वतीने मोठी आर्थिक तरतूद करण्‍यात येत असल्‍याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
पुढे बोलताना महाजन म्हणाले की ज्‍यानी हे प्रश्‍न निर्माण केले तेच आता हे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी ओरड करू लागलेले आहेत. शिक्षण सेवक पद त्‍यांच्‍याच सत्‍ता काळात निर्माण झालेले असुन विनाअनुदानित धोरणही त्‍यांनीच आणलेले आहे. या धोरणामुळे शिक्षकांचे वेतन बंद झाले मात्र हे वेतन सुरू करण्‍याचे काम २०१६ मध्‍ये तत्‍कालिन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते पुन्‍हा २०१९ मध्‍ये ठाकरे सरकारने बंद केलेले आहे. आता मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील राज्‍य सरकार शिक्षकांचे आणि शिक्षण क्षेत्रांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद करत आहे ही आर्थिक तरतूद भविष्‍याची गुंतवणूक असुन या माध्‍यमातून दर्जेदार शिक्षण देण्‍यास प्राधान्‍य मिळणार आहे.
ज्‍यानी शिक्षण क्षेत्रासह शिक्षकांचे नुकसान केले त्‍यांना मतदान मागण्‍याचा अधिकारी नाही अशी टिका करून गिरीश महाजन म्हणाले की आगामी काळात शिक्षकांचे सर्व प्रश्‍न सोडविण्‍यासाठी डबल इंजिन सरकारचे प्रतिनिधीत्‍व करणारे प्रा. किरण पाटील यांना प्रथम पसंदीचे मतदान देवून आपले प्रश्‍न सोडविण्‍यासाठी आपल्‍या हक्‍काचा उमेदवार सभागृहात पाठवावा असे आवाहन केले.
केंद्र व राज्यातील सरकारच्या माध्यमातून आपण शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम केलेले आहे. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्‍न, भरतीचा प्रश्‍न यासह पेन्शनचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक पध्दतीने काम करीत असल्‍याचे सांगत माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यापुढील कालावधीतही उर्वरित शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रा. किरण पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहा. प्रा.किरण पाटील हे आपल्याकडे कर्ज मागायला आले आहेत. त्‍यांच्‍या या कर्जाचे जामीनदार आम्‍ही सर्वजण असुन त्यांना मतदानरूपी कर्ज देण्याचे काम आपण सर्वांनी करावे त्या मतदानरूपी कर्जाची व्याजासह परतफेड करतील. तेव्हा प्रा. किरण पाटील यांच्या पाठीशी सक्षमपणे उभ रहा असे आवाहन माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मग्गे यांनी प्रास्ताविक केले यावेळी जिल्हाभरातील संस्थाचालक शिक्षक मतदार भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed