• Tue. Apr 29th, 2025

संवेदनशील राज्य सरकारमुळेच चारशे चौदा कोटीचे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई-माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Oct 1, 2022

संवेदनशील राज्य सरकारमुळेच चारशे चौदा कोटीचे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

माजी मंञी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती

निलंगा(प्रतिनिधी);-लातूर जिल्ह्यातील चार लाख चौपन्न हजार सहाशे पाच शेतकऱ्यांना खरीप नुकसानभरपाई पोटी चारशे चौदा कोटी संवेदनशील राज्य सरकारमुळेच मिळाले अशी माहिती माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

केंद्र सरकारच्या एनडीआरएफ निकषात बसत नसले तरी राज्य सरकारने खरीप नुकसानभरपाई पोटी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी,शंखी गोगलगाय,संततधार पाऊस यामुळे बहूतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.माञ पहिल्या टप्यात अतिवृष्टीचे अनुदान राज्य शासनाने जाहीर केले. व शंखी गोगलगाय सततचा पाऊस हे दोन्ही नैसर्गिक संकट एनडीआरएफच्या नियमात बसत नसले तरी शंखी गोगलगाय व सततचा पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा अक्रोश आणि माजी मंञी निलंगेकर व मराठवाड्यातील भाजपा सेना एकनाथ शिंदे गट आमदारानी मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी यांच्या लक्षात आणून दिला.त्याच बरोबर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.हा निधी मिळेल का नाही असा संभ्रम जिल्ह्यातील बहूतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता.परंतु कोणत्याही परिस्थितीत निकष बाजूला ठेवून जगाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून युतीच्या संवेदनाशील सरकारने नुकसानभरपाई पोटी नुकतीच मदत जाहीर केली आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

सततच्या पावसामुळे दोनशे नव्वद कोटी,शंखी गोगलगाय ९३ कोटी,अतिवृष्टीचे २७ कोटी ९९ लाख अशी मदत एकून चार लाख चौपन्न हजार चारशे चौदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असून लवकरच ही रक्कम खात्यावर जमा होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विरोधकांनी चुका दाखवाव्यात आम्ही स्वागत करू तुम्ही सत्तेत असताना कधीही एवढी मोठी मदत शेतकऱ्यांना केली नाही परंतु या राज्याचे संवेदनाशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यानी सर्वच निकष बाजूला ठेवून ही मदत शेतकऱ्यांना दिली आहे.याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.असे माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील यानी सोशल मिडियावर सांगत माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed