जि.प. प्रशाला, शाळा भोजराजनगर ता. शिरुर अनंतपाळ येथील शाळेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी):-शहरातील प्रभाग.13 मधील जि.प.प्रशाला, शाळा भोजराजनगर येथील शाळेत ज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्त परिसरातील व्यापारी, सेवानिवृत्त शिक्षक, प्रगतशिल शेतकरी, प्रतिष्ठीत नागरिक,सेवानिवृत्त अधिकारी, ईत्यादीसह 20 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला….
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. दयानंद वलांडे,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा प्रभागाचे नगरसेवक. सुधीर लखनगावे, मुख्याध्यापक. विजयकुमार संभाळे,सहशिक्षक.विजयाताई धुमाळे, मनिषाताई भुरे,सुर्यवंशी एम.टी, रोहिदास नाब्दे,देविदास सांगवे, काशिनाथ ऊंबरगे,आश्विनीताई देवशटवार यांच्यासह शाळेतील शिक्षक,बालक, पालक मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सहशिक्षक काशिनाथ ऊंबरगे सर व आभार मुख्याध्यापक विजयकुमार संभाळे यांनी मानले.