सीए मुर्तुजा काचवाला यांचे व्याख्यान
लातूर/प्रतिनिधी:वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष सीए मुर्तूजा काचवाला यांची शहरातील शाहू महाविद्यालय व भालचंद्र रक्तपेढीत व्याख्याने संपन्न झाली.
राजर्षी शाहू महाविद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सीए काचवाला यांनी सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे,सुधीर जाधव,उदय किटेकर,श्रीकांत भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
भालचंद्र रक्तपेढीत संपन्न झालेल्या चर्चासत्रातही काचवाला यांनी शहरातील सीएंशी संवाद साधला.यावेळी लातूर शाखेचे लेखापरीक्षक सीए जितेश अग्रवाल,विद्यार्थी संघटना अध्यक्ष एकनाथ धर्माधिकारी यांच्यासह शाखेच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी श्वेता जैन,सौरभ अजमेरा,पियुष चांडक यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर शाखेचे अध्यक्ष सीए द्वारकादास भुतडा,सूत्रसंचलन विद्यावती वंगे, तर आभार प्रदर्शन सचिव राहुल धरणे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द्वारकादास भुतडा,उपाध्यक्ष विश्वास जाधव, राहुल धरणे,कोषाध्यक्ष महेश तोष्णीवाल,एकनाथ धर्माधिकारी, सदस्य निलेश बजाज यांनी परिश्रम घेतले.