निलंगा येथे सर्व बॅन्ड पथकाच्या वतीने महेश मांजरेकरांचा जाहीर निषेध
निलंगा :-निलंगा तालुक्यातील सर्व बँन्ड पथक, बँजो पथक यांच्य वतीने महेश मांजरेकर यांनी एका शुटींग दरम्यान बँन्ड पथकातील लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन अवमानकारक अपमान केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकापासुन यांच्या चौकापासुन उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओबीसी नेते प्रा. दयानंद चोपणे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीवीर लहुजी शक्तीसेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष श्री गोविंद सुर्यवंशी, आरपीआय आठवले गटाचे नेते श्री अंकुश ढेरे व बॅन्ड पथकाचे प्रमुख रवि गायकवाड यांच्या उपस्थितीत मोर्चा आयोजीत केला होता. यावेळी बोलताना श्री दयानंद चोपणे म्हणाले की, आजच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये थोर महापुरुषाचा अवमान करुन समाजामध्ये जातीय तणाव निर्माण करीत आहेत. त्याचबरोबर सामान्य मानव कलाकाराला अपमानित करण्याचा जाणुनु बुजुन प्रयत्न केला जात आहे. अशा महेश मांजेरकरांवर कार्यवाही करुन त्यानी जाहीर माफी मागावी असे ते म्हणाले. तरी यावेळी गोविंद सुर्यवंशी म्हणाले की, असा जर बॅन्ड पथकाच्या कलाकाराचा अपमान होत असेल तर क्रांतीवीर लहुजी शक्तीसेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल असे ते म्हणाले त्यावेळी झनकार बँन्ड पथकाचे प्रमुख रवि गायकवाड औराद (शा.), सीता गीता बँन्ड पथकाचे प्रमुख रणजीत कांबळे, सम्राट बॅन्ड पथक, साई बॅन्ड पथक, सत्याई बॅन्ड पथक, महाराष्ट्र बॅन्ड पथक, या बँन्ड पथकाचे प्रमुख रामभाऊ कांबळे, प्रकाश रणदिवे, माधव जाधव, अनिल कांबळे, विनायक धामराव बंडीधनगर, अजयदादा कांबळे, राजु जाधव, विजय जाधव, सागर गायकवाड, दत्ता गायकवाड, ओमकार गायकवाड, उमेश सुर्यवंशी, गायक ज्ञाने·ार माने (सावरी) इत्यादी शेकडो कला पथकातील लोकांनी बॅन्डच्या तालावर व गीताच्या माध्यमातून महेश मांजरेकर यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व बॅन्ड पथकाच्या व क्रांतीवर लहुजी शक्तीसेना चळवळ कट्टा निलंगाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निलंगा येथे सर्व बॅन्ड पथकाच्या वतीने महेश मांजरेकरांचा जाहीर निषेध
