• Wed. Apr 30th, 2025

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढाकारातून गोद्रीच्या कुंभमेळ्यास अन्नधान्य रवाना

Byjantaadmin

Jan 24, 2023

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढाकारातून गोद्रीच्या कुंभमेळ्यास अन्नधान्य रवाना
खा. सुधाकर श्रृंगारेंनी दाखविला हिरवा झेंडा

लातूर/प्रतिनिधी ः- जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदु गौर बंजारा व लबाना नायकवडा समाजाचा कुंभमेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून अन्नधान्य पाठविण्यात आले आहे. या अन्नधान्यांच्या ट्रकला खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते तर प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले आहे.
अखिल भारतीय हिंदु गौर बंजारा व लबाना नायकवडा समाजाचा जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे दि. 25 ते 30 जानेवारी दरम्यान कुंभमेळा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी राज्यासह देशभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात समाजाचा रितीरिवाज, इतिहास यासह धर्म संस्कृतीचे जतन करण्याबाबत योग्य दिशा देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी विविध संतमहात्मांचे व्याख्यान व प्रवचन होणार आहे. या मेळाव्यासाठी देशभरातील येणार्‍या समाजबांधवाकरीता विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अनेकजन वेगवेगळ्या माध्यमातून मदत देऊ करीत आहे. त्याअनुषंगानेच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून कुंभमेळ्यास येणार्‍या समाजबांधवांसाठी गोद्री येथे अन्नधान्य व किराणा साहित्य देण्यात येत आहे.
या अन्नधान्यासह किराणा साहित्याचा ट्रकला खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गोद्रीकडे रवाना करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब राठोड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, बालाजी मालुसुरे, सत्यवान पांडे, संतोष ठाकूर, अरविंद नागरगोजे, विनोद मालू, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *