• Wed. Apr 30th, 2025

धनुष्यबाण कुणाचे? 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार अंतिम निर्णय?

Byjantaadmin

Jan 24, 2023

नवी दिल्ली, 24 जानेवारी : शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचे? या प्रश्नाभोवती मागील तीन आठवड्यापासून राजकीय उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अखेर धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला येणार आहे. निवडणूक आयोग आपला अंतिम निर्णय 30 तारखेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धनुष्यबाण चिन्हावर अधिकार कुणाचा असणार या मुद्दावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. पण, आता धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही. 30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार आहे. ठाकरे गट कोणतही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 30 तारखेच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती.

‘शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *