• Wed. Apr 30th, 2025

एलआयसी विभागात 9,400 पदांची मेगाभरती:प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाणून घ्या- अर्ज करण्याची प्रक्रिया

Byjantaadmin

Jan 24, 2023

जीवन के साथ भी, जीवन के बाद भी’ असा नारा देऊन घराघरात पोहचलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 9,400 जागांची मेगाभरती केली जाणार आहे. यासाठी महामंडळाच्या वतीने जाहिरात काढण्यात आली आहे. चला तर आज आपण या पदासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता किती लागणार, अर्जाचे शुल्क किती आहे, याबाबत जाणून घेऊया. ज्यामुळे उमेदवारांना नक्कीच फायदा होणार आहे.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)

अ. क्र. क्षेत्र पद संख्या
1 नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) 1216
2 नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) 1033
3 सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) 561
4 ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) 1049
5 साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) 1408
6 साउथर्न झोनल ऑफिस (SZ) 1516
7 वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) 1942
8 ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) 669
Total 9400

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.

वयाची अट

या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षातील उमेदवार यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

शुल्क किती लागणार

जनरल व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरणा करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

प्रवेशपत्र : 04 मार्च 2023 पासून

परीक्षा पद्धत : ऑनलाईन

पूर्व परीक्षा : 12 मार्च 2023

मुख्य परीक्षा : 08 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट पाहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *