लातुर:-लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले व शिवसेनाप्रमुख तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली
लातूर जिल्ह्यातील लातूर शहर औसा निलंगा देवणी शिरूर आनंतपाळ या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली लातूर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले पाच नंबर चौक येथे तसेच विवेकानंद चौक कोरे गार्डन आरटीओ कार्यालय सुशीलादेवी नगर बाबळगाव बसवेश्वर चौक येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले तसेच वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला सुशीलादेवी नगर बाबळगाव येथे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या व पेनची वाटप करण्यात आले
निलंगा शहरांमध्ये भव्याचे मोटरसायकल रॅलीचा आयोजन करण्यात आले होते तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य तसेच निलंगा विधानसभा उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश रेशमी विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे महिला आघाडी प्रशांत वांजरवाडे युवा सेना सर्व उपशहर प्रमुख उपतालुकाप्रमुख विधानसभा संघटक समन्वयक उपस्थित होते
देवणी तालुक्यामध्ये तालुकाप्रमुख मुकेश सुडे माजी तालुका प्रमुख पंडित भंडारे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख यांनी शासकीय हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करून शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मानवंदना दिली
औसा तालुका येथे तालुकाप्रमुख सतीश शिंदे तसेच शहर प्रमुख सुरेश दादा भुरे बजरंग दादा जाधव सर्व उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी शिवसेनाप्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये तालुकाप्रमुख भागवत वंगे शहरप्रमुख सतीश शिवने सर्व उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख चारही नगरसेवक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
वरील पाचही तालुक्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी शिवप्रेमी जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मानवंदना दिली
लातुर जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
