निलंगा:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, निलंगा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, जय जिजाऊ यांच्या विचाराला, आदर्श माणून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने, हळदी कुंकाचा कार्यक्रम, विधवा महिला ,घटस्फोटीत, मतिमंद, व वयोवृद्ध ज्येष्ठ महिला बरोबर तसेच, सुहासिनी सह हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न करून समाजात समानता निर्माण करण्याच्या हेतूने, समाजासमोर नवीन संदेश देण्याचा उपक्रम महिला आघाडी तालुका संघटिका रेखाताई पुजारी, शहर संघटिका दैवता ताई सगर, उप तालुका प्रमुख सविता पांढरे , उपशहर प्रमुख अरुणा माने, ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे टिनाताई, जय जिजाऊ प्रदेश अध्यक्ष, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष प्रीती कोळी, अलका मुगळे, संध्या आरदवाड, दैवता पवार, अनिता पवार, सुप्रिया कांबळे, शीला हाडगेकर आदी पाचशे महिलाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.