• Wed. Apr 30th, 2025

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

Byjantaadmin

Jan 23, 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023
मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

लातूर, दि.23(जिमाका): औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाहती 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
हे पुरावे असणार ग्राह्य- 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *