• Wed. Apr 30th, 2025

उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख-बावनकुळे

Byjantaadmin

Jan 23, 2023

मुंबई, 23 जानेवारी :  आज ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी एक वाजता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा होऊ शकते. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.  उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील त्यांचा पक्षप्रमुख पदाचा कालावधी आज संपत आहे. जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाही, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याबाबत माला शंका वाटते असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा आणि पिंपरी या दोन रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  कसबा आणि पिंपरीमध्ये उमेदवार द्यायचा की निवडणूक बिनविरोध करायची हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. पण आम्ही दोन्हीकडं उमेदवार देणार आणि आम्हीच विजयी होणार असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, मी वाचाळवीर नाही तर सरकार आणि पक्षात समन्वय राखण्यासाठी बोलावं लागतं. भाजप राजकारण करत नाही. आम्ही 90टक्के विकास काम करतो, विरोधी पक्षाने भोंगे वाजवणे बंद केलं तर आम्हाला देखील बोलण्याची गरज पडणार नाही. विरोधी पक्षांनी सकारात्मक कामं करावं असा सल्लाही यावेळी बावनकुळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *