• Wed. Apr 30th, 2025

शिक्षणातून केवळ शिक्षण नव्हे तर नितीमत्ता व चारित्र्य संपन्न पिढी निर्माण होण्याची गरज : उच्च तंत्र सहसंचालक -उमेश नागदेवे

Byjantaadmin

Jan 22, 2023

शिक्षणातून केवळ शिक्षण नव्हे तर नितीमत्ता व चारित्र्य संपन्न पिढी निर्माण होण्याची गरज : उच्च तंत्र सहसंचालक -उमेश नागदेवे

निलंगा:-शिक्षणाचा हेतू केवळ शैक्षणिक प्रमाणपत्र देणे नव्हे तर चारित्र्यसंपन्न युवा पिढी निर्माण करणे गरजेचे असून प्रमाणपत्रापेक्षा त्याच्याकडे निर्णय क्षमता असणे अवश्यक आहे . ज्या विद्यार्थ्याकडे निर्णय क्षमता आहे त्याला जीवनात यश निश्चित मिळत असतेच असे मत उच्च तंत्र औरंगाबाद विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
जयभारत कॉलेज ऑफ फार्मसी दापका ता. निलंगा येते नुकतीच मान्यता मिळाली असून यापार्श्वभूमीवर शुक्रवारी ता. २० जानेवारी रोजी हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक श्री उमेशजी नागदेवे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लाला पटेल हे होते . माजी प्राचार्य बालाजी कामठाणे , श्री शामगीर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतराव पाटील , संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ.राजेश्वर पाटील , डी . बी . बरमदे , राजेंद्र कासट , नंदकिशोर लोया , ईश्वर बाहेती , सौरभ कुमार , अजित चव्हाण प्रा . अनिल भोईबार , उपप्राचार्य सुधाकर बिराजदार , राठोड्याचे माजी सरपंच पंकज शेळके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागदेवे म्हणाले की, शैक्षणिक संस्थानी शिक्षणाकडे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू नये आजच्या विद्यार्थ्याला जीवनामध्ये चांगलं काय अन् वाईट काय हे समजलं पाहिजे . नवीन शैक्षणिक धोरण अत्मसात करून सध्याच्या परिस्थितीत शैक्षनीक संस्थांना टिकून राहण्यासाठी नवीन युगाला उपयोगी असणारे तंत्रज्ञानयुक्त समाज उपयोगी आऊट पुट देणाऱ्या एकाच छताखाली मल्टी फॅकल्टीज शिक्षणाची कास धरावी लागेल याबरोबरच चारित्र्य मूल्य शिक्षणाचीही जोड दिली गेली पाहिजे अभ्यासक्रमाबाबत अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या आवडीचा विषय घेऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो . फार्मसी अभ्यासक्रमाबाबत बोलताना फार्मसी अभ्यासक्रमाला सध्या चांगले दिवस आहेत . मात्र भविष्यात हेच दिवस राहतील याची शाश्वती नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग राहून वेळीच काळाची पावले ओळखून शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण संस्थांनी देखील आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व व त्याचे मार्ग समजून सांगितले पाहिजे . शिक्षणाचा प्रसार ही एक सामाजिक चळवळ बनली पाहिजे . संस्थांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी आपलं अतूट असं नातं निर्माण केलं पाहिजे . वसंतराव पाटील यांच्या अंगी असलेली सामाजिक जाण व शिक्षणाप्रतीची कमालीची तळमळ पाहून लोकांच्या भल्यासाठी जेवढी म्हणून काही मदत करता येईल तेवढी मदत आपण त्यांना केली असल्याचे श्री नागदेवे यांनी सांगितले . जगातील सर्वात महागडी वस्तू जर काय असेल तर ती म्हणजे वेळ ! त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करून करून सदुपयोग केल्यास जीवनात यश निश्चित आहे असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला .
निलंगा तालुक्यातील ७ हजार लोकवस्ती असलेल्या दापका या छोट्याशा गावी जय भारत शैक्षणिक संकुलात डी . व बी . फार्मसी महाविद्यालय सुरू झाले आहे . परिणामी बहुजनांच्या गोर – गरीब लेकरांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे दालन सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे .
निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी येथे १ ९ ६० मध्ये स्थापन झालेली श्री शामगीर शिक्षण संस्था म्हणजे तालुक्यातील एक नामांकित शिक्षण संस्था होय . ग्रामीण भागातील गोर गरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने ही संस्था कार्यरत आहे . या संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झालेले श्री वसंतराव पाटील मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले . त्यानंतर त्यांच्याकडे या संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाची धूरा आली . मागील अनेक वर्षापासून ते ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत . या संस्थेअंतर्गत कोतल शिवणी बरोबरच सिंदीजवळगा , हालकी व दापका येथे शाखा आहेत . ३ एकरच्या प्रांगणात वसलेले दापका येथील जय भारत शैक्षणिक संकुलाने तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मोठी भर घातली आहे . प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा , डीटीएड , वरिष्ठ महाविद्यालय , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे बी . ए . बी . कॉम , टिळक विद्यापीठाचे बी . ए . बी . कॉम . एसआरटी विद्यापीठाचे एम . ए . एम . कॉम या बहिस्थ अभ्यासक्रमाबरोबरच मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे वस्तीगृह अशा सुविधा निर्माण केल्या आहेत. जय भारत संकुलाचे कार्याध्यक्ष श्री. वसंतराव पाटील साहेब यांनी बोलताना आम्ही विद्यार्थी केंद्रस्थानी मानून गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना अनेक संकटाना संघर्ष करत इतपर्यंत आलो आहोत, चारित्र्य संपन्न पिढी घडविण्याचे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून हाती घेतले आहे.तर अध्यक्षस्थानी दापका ग्रामपंचायत सरपंच श्री लालाजी पटेल हे होते. विशेष उपस्थिती माजी प्राचार्य श्री. कामठाणे बालाजी हे होते
ईश्वर बाहेती कास्ट लोहिया व सैरभ कुमार व डॉ राजेश्वर पाटील कॉलेज साठी खूप कष्टाळू अनिल भोईबार सुत्रसंचलन भोपी सर व जाधव सर आभार. दाताळ सर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *