जिजाऊ सावित्री जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचा महिला सक्षमीकरणासाठी उद्योजक मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम
निलंगा : प्रतिनिधी
जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी निलंगा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून निलंगा येथील जिजाऊ सृष्टी येथे उद्योजक महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिजाज सावित्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी बिराजदार, भाग्यश्री बिराजदार, डॉ. अनिता गणापुरे, नागमोडे, घोरपडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव जाधव एम एम, जिल्हा संघटक विनोद सोनवणे, तालुकाध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे, सचिव इंजि. मोहन घोरपडे, डी.एन. बर्मदे आदि उपस्थित होते.
महिलांच्या सक्षमीकरनासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जिजाऊ सृष्टी येथे यशस्वी उद्योजक महिलांचा सत्कार करून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांच्या कलाकृती व वस्तूंचे स्टॉल उभे करण्यात आले. यावेळी महिलांना व्यवसाय वाढीसाठी काय केलं पाहिजे याबद्दल उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता न घाबरता महिलांनी येऊन स्वतः सक्षम झाले पाहिजे असा संदेश आजदेण्यात आला.
प्रास्ताविक अर्चना जाधव यांनी मांडले. सूत्रसंचालन वैशाली इंगळे तर आभार नम्रता हाडोळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजश्री शिंदे, वैशाली बरमदे, रंजना जाधव, स्नेहा बोळे यांनी परिश्रम घेतले.