आठ दिवसांतच मसलगा पाटीवरील अर्धवट रस्ता कामाला झाली सुरुवात
छावा संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाला आली जाग
निलंगा : मसलगा पाटी येथील अर्धवट बसस्थानकाच्या कामाला लातूर-जहिराबाद महामार्गाच्या गुत्तेदाराने सुरुवात केली. यामुळे नागरिक व वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे पूर्ण वर्ष. तरी निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीजवळील सोळ नदीच्या पुलाजवळील काम अर्धवट आहे. यामुळे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले. रस्त्याच्या दुरवस्थेचे वृत्त जनता एक्सप्रेस मध्ये प्रसिध्द करताच अवघ्या आठ दिवसांत यंत्रणा हलली (सोमवार) प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे
दिला होता.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री
नितीन गडकरी यांच्याशी निकटचे संबंध असल्याने तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून लातूर – जहिराबाद हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेतला. यामुळे निलंगा तालुक्यातील अनेक गावे या राष्ट्रीय महामार्गावर आली.
छोटे छोटे अपघात तर दररोजच होत आहेत. यामुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला होता. हे काम तत्काळ होऊन रस्ता अपघातमुक्त व्हावा, त्याची दखल घेऊन छावा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष दास साळुंके यांनी तिसऱ्याच दिवशी निलंगा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. १६ जानेवारीपर्यंत रस्ता कामाला सुरुवात नाही केल्यास पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याचीही दखल प्रशासनाने घेतलेली दिसत आहे. तत्काळ या रस्त्यासाठी असणाऱ्या अडचणी सोडवून मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित रस्त्याचा गुत्तेदार व ग्रामस्थांनी बैठक घेतली. यातून सकारात्मक तोडगा निघाला. यामुळे सोमवारी सकाळपासूनच अर्धवट रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. हे अर्धवट काम सुरू झाल्याने त्या भागातील नागरिकांची दळणवळणाची सोय झाली. या मार्गावर आता वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्या भागाचा विकास होण्यास मदत होत आहे. याच रस्त्यावर तालुक्यातील मसलगा पाटीजवळ सोळ नदीवर अत्याधुनिक मलेशियन पध्दतीचा पूल बांधण्यात आला आहे. या निलंग्याचे पुलापासून सुमारे ५०० फुटापर्यंत परिसरातील वाहनधारकांतून पुढे निलंग्याकडे जाताना समाधान व्यक्त होत आहे. पूर्ण या रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी आले आहे. ऐन पुलावर हे काम होण्यास मदत होणार असल्याच्या अर्धवट असल्याने एकेरी रस्ता भावना वाहनधारक व मसलगा, आहे. अचानकपणे रस्ता एकेरी गौर या गावांसह या रस्त्यावरून होत असल्याने मोठमोठे अपघात प्रवास करणारे वाहनधारक व्यक्त झाले आहेत. यात अनेकांचे बळी करीत आहेत.