• Wed. Apr 30th, 2025

चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आमची-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Jan 17, 2023

चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आमची

औसा येथे शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांच्यासह सप्त रत्नांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सन्मान

लातूर :-शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष करणाऱ्या चळवळी असल्याचं पाहिजे त्या टिकल्या पाहिजेत तुम्ही आम्हीं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सामान्य नागरिकांचे असो ते सोडवण्यासाठी चळवळीतील कार्यकर्ता हा दुवा म्हणुन महत्वाचा घटक आहे हे टिकवण्यासाठी यांना बळ देणे गरजेचे असून यासाठी लोकनेते विलासराव देशमुख साहेब माजी केंद्रिय गृह मंत्री शिवराज पाटील चाकूरकर माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यांत विकासाचा पाया रचला त्याच धर्तीवर आम्ही व माजी मंत्री आमदार अमित देशमुख कार्य करीत आहोत शेतकऱ्यांना न्याय देण्याबरोबर चळवळी टिकल्या पाहिजेत अशीच भूमिका आमची राहिलेली आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते औसा येथे रविवारी सायंकाळी आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने यांच्यासह सप्त रत्नांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून ते बोलत होते

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, महंत राजेंद्र गिरी महाराज, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी सत्कार मुर्ती शेतकरी नेते ,राजेंद्र मोरे,राजकुमार पल्लोड , मुकेश जाधव, डॉ ए. टी अरब, डॉ राचमाले, अँड मुक्तेश्वर वागदरे, धनंजय भोसले, राजू पाटील या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सप्तरंगाचा गौरव करण्यात आला

*चांगल्या संस्था चालवून लोकहिताचे कार्य करतोय*

*कोविड काळात देशाची आर्थिक व्यवस्था शेतकऱ्यांमुळे वाचली*

*माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन*

पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले राजकारणात काम करीत असताना आम्हाला आमच्या नेत्यांनी जो आदर्श घालून दिला त्याचे पालन करून आम्ही काम करीत आहोत असे सांगून त्यांनी कोरोनाच्या काळात फक्त दोन गोष्टी सुरू होत्या एक हॉस्पिटल आणि दुसरे शेती ज्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी संकट काळात महत्वाची भूमिका पार केली त्यांना मदत करण्यासाठी कांहीही झाले तरी आमचे कारखाने व जिल्हा बँक कमी पडणार नाही पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज असो की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव कसा देता येईल याकडे लक्ष दिले एखादा मोठा प्रकल्प होईल अशी भोगोलिक परिस्थिती नाही मात्र आपल्याकडे शेतीतील आम्ही संस्था बुडवून राजकारण करीत नाही तर चांगल्या संस्था चालवून लोकहिताचे काम करत असल्याचे यावेळी बोलतांना स्पष्ट केले

वाढदिवसाला देशमुख साहेब यांची उपस्थिती हीच कार्याची पावती

यावेळी बोलताना सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवुन आपल्या वाढदिवसाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांची उपस्थिती हीच तुमच्या आयुष्यातील कार्याची पावती आहे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या..

कार्यक्रमास लातूर ग्रामीणचे माजी आमदार अँड त्रिंबक त्र्य भिसे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारूती ममहाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत बाजुळगे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी, काँग्रेस मिडिया जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, पृथ्वीराज शिरसाठ, उदयसिंह देशमुख, संभाजी सूळ, सचिन दाताळ, सतीश पाटील, नारायण नरखेडकर, अँड सचिन ढवण, दगडु बर्डे, पी सी पाटील, नवनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वागत अध्यक्ष राजीव कसबे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन पी. सी. पाटील विवेक सौताडेकर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *