व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेची निलंगा तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे, कार्याध्यक्षपदी तुकाराम सूर्यवंशी
निलंगा /प्रतिनिधी :-व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची निलंगा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे . या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार परमेश्वर शिंदे यांची तर कार्याध्यक्षपदी तुकाराम सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे .
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे , राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला , राज्य अध्यक्ष राजा माने व मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या सूचनेवरुन जिल्हाध्यक्ष बालाजी फड यांनी निलंगा तालुका कार्यकारिणी जाहीर केली . या कार्यकारिणीत अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे, कार्याध्यक्षपदी तुकाराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजाभाऊ सोनी व असलम झारेकर, सरचिटणीस मल्लिकार्जुन कोळ्ळे, सहसरचिटणीस मिलिंद कांबळे, कोषाध्यक्ष रमेश शिंदे, कार्यवाहक जावेद मुजावर
संघटक प्रमोद कदम, प्रसिद्धी प्रमुख रवीकिरण सुर्यवंशी, सदस्य ज्ञानेश्वर मडोळे, मारोती लोहार,
नामदेव तेलंग, प्रशांत साळुंके, सिध्दनाथ माने, अजित लोभे यांची निवड करण्यात आली. तर मार्गदर्शन म्हणून संजय इंगळे, लक्ष्मण पाटील, हरीभाऊ सगरे काम पाहणार आहेत. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.