शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची तर विधानसभा प्रमुख पदासाठी शिवाजीराव पांढरे यांची निवड
निलंगा (प्रतिनिधी)शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरूरकर संपर्क नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या सूचनेवरून लातूर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून हरिभाऊ सगरे यांची तर विधानसभा प्रमुख म्हणून शिवाजीराव पांढरे शिवसेना भवन मुंबई येथून यांची निवड करण्यात आली आहे.
निलंगा तालुक्यामध्ये अखंडित शिवसेनेचे निष्ठेने कार्यरत असणारे सर्वांना जय महाराष्ट्र म्हणून आपल्या नमस्कार आणि कणखर शिवसेनेचा बुलंद आवाज तेवत ठेवणारे हरिभाऊ सगळे यांनी सन 1998 ते 1999 पासून शिवसेनेमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली व अखंडितपणे शिवसेनेमध्ये कार्यरत असणारे हिंदुरुदय सम्राट समस्या प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारासोबत कायम निष्ठेने असणारे शिवसैनिक म्हणून हरिभाऊ सगळे व शिवाजीराव पांढरे यांना शिवसेनेने लातूर जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख व विधानसभा प्रमुख अशी जबाबदारी देऊन शिवसेना संघटना बांधणीचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे ती जबाबदारी निष्ठेने पार पडणार असल्याचे मत आमच्याशी संवाद साधत असताना नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले या नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, तालुकाप्रमुख अविनाश दादा रेश्मे, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, बालाजी दवणे, दत्ताभाऊ जाधव, श्याम लखणे, दत्ता पेटकर सह टीम समीर खादिम व त्यांची टीम शिवसेना सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.