मकरसंक्रात निमित्त स्मशान भूमीवर हळदी कुंकूवासाठी महिलांची गर्दी
माकणी थोर येथे महिलांचा अनोखा उपक्रम
निलंगा:-स्मशानभूमी म्हंटल की पटकन समोर येणारा शब्द मरण,भिती,भूत किंवा शेवट परंतु माकणी थोर येथे काल मकर संक्रातिच्या दिवशी गावातील २०० ते ३०० महिलांनी स्मशान भूमीवर जाऊन हळदी कुंकू व एकमेकांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला .या अनोख्या कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
निलंगा येथील शांतीवन ग्रुपचे काम पाहून गावातील काही ज्येष्ठ व तरुणांनी एकत्र येत गावातील स्मशान भूमी परिसर साफ सफाई करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे नंदनवन हे नामकरण करत दर रविवारी चाळीस ते पन्नास तरुण व ज्येष्ठ नागरिक एकत्रित येऊन मोफत श्रमदान मोहीम हाती घेतली. ते कार्य अविरत सुरूच आहे.
हे काम पाहून गावातील व बाहेरील अनेक दात्यानी या सामाजिक उपक्रमास निधीच्या माध्यमातून मोठा हातभार लावला यात प्रामुख्याने तानाजी गुरुजी माकणीकर ,माधव नरसिंग सूर्यवंशी यांचे मोलाचे व विशेष योगदान आहे.
आजतागायत संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली असून,सुमारे पन्नास ते साठ ब्रास पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत,जवळपास परिसरात बसण्यासाठी ५० ते ६० बेंचेस उपलब्ध झाले आहेत.उर्वरित राहिलेले काम लवकरच पूर्ण करण्याचा नंदनवन सेवा समूहाच मानस आहे.काल हळदी कुंकू कार्यक्रमासाठी गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठी गर्दी केली होती. यात बबीता माकणीकर,लता सूर्यवंशी, जनाबाई सूर्यवंशी, अर्चना सूर्यवंशी, राजाबाई आकडे, नंदा उमाटवाडे, अरुणा बामणे, लुबाजाबाई तळेगावे, अनुसया सुर्यवंशी, मुक्ताबाई बामणे,अनुसया सूर्यवंशी, वर्षा सूर्यवंशी,नंदा येळीकर, सुवर्णा गायकवाड, अनुसया तळेगावे,जिजाबाई येळीवाले,विजयाबाई येळीकर,मनीषा गायकवाड शांताबाई आकडे, सुमित्रा कोकरे,संगिता म्हेत्रे,लता सूर्यवंशी,रोहिणी सूर्यवंशी, शांताबाई सूर्यवंशी, पुष्पाबाई सूर्यवंशी, सखुबाई सूर्यवंशी, शेख मॅडम आदी महिलांनी मोठी गर्दी करत नंदनवन परिसरात होत असलेल्या कार्याचे कौतुक केले. या अनोख्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
यावेळी नंदनवन समुहाचे विष्णुकांत सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी बालाजी तळेगावे,भीम सूर्यवंशी, दत्ता बामणे,हारी सुर्यवंशी,वसंत सुर्यवंशी,दिलीप सुर्यवंशी,मारुती बोरफळे, जगदीश सुर्यवंशी, राजाराम आकडे,विजयकूमार सुर्यवंशी,शखर सूर्यवंशी, व्यंकोबा येळीकर,विजय सूर्यवंशी आदी गावकरी उपस्थित होते.