• Wed. Apr 30th, 2025

आ.अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने कासार सिरसी – कोराळी व आलमला – उंबडगा रस्त्यांना मंजुरी: १२ कोटी ९० लाखांचा निधी

Byjantaadmin

Jan 14, 2023

आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने कासार सिरसी – कोराळी व आलमला – उंबडगा रस्त्यांना मंजुरी

या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १२ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर..

औसा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर कासार सिरसी – कोराळीवाडी – कोराळी व आलमला – उंबडगा रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. अत्यंत महत्वाच्या या रस्ता कामासाठी एकूण १२ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेऊन या संदर्भात आ. अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केल्याने हा विषय मार्गी लागला आहे.

या रस्त्याच्या संदर्भात आ. अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय आणि राज्य स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कासार सिरसी – कोराळीवाडी – कोराळी – राज्य सरहद्द (घोटाळा) या ७ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ८ कोटी ८० लक्ष रुपये तसेच रामा २४२ – आलमला – उंबडगा – प्ररामा ३६१ या ५.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ४ कोटी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. २ अत्यंत महत्वाच्या रस्त्यांसाठी एकूण १२ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आलमला – उंबडगा या रस्त्यावरील पूल बांधकामाचा सुमारे २ कोटींचा प्रस्ताव सुद्धा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे.या रस्त्याच्या अतिशय दयनीय अवस्थेमुळे त्या भागातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. १० ऑगस्ट, २०२१ रोजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री यांची भेट घेऊन तसेच या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेऊन या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे.

सदरील रस्ता कामासाठी मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद् फडणवीस व राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. लातूरचे खासदार श्री सुधाकरजी शृंगारे यांनीही या कामांसाठी पाठपुरावा केला होता, त्यांचेही आभार आ. अभिमन्यू पवार यांनी मानले आहेत.

______________________________________

अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी..

देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असताना आ. अभिमन्यू पवार यांनी २०१९ पुर्वी कासार सिरसी – कोराळीवाडी – कोराळी रस्ता कामाची मंजुरी आणली होती.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोव्हीड चे कारण दाखवून या रस्ता कामाच्या निधीला कात्री लावण्यात आली. मात्र या व आलमला – उंबडगा रस्त्याची दुर्दशा पाहाता या कामांना मंजुरी मिळवून घेण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या कामांना मंजुरी मिळाली असून जवळपास १३ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *