पिंपळवाडी (जेवरी) येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
जि.प.प्रा.शा.पिंपळवाडी (जेवरी) येथे जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती ज्योती सोळुंके व प्रमुख पाहुणे श्रीमती वंदनाताई सोळुंके होत्या. सर्व मान्यवरांचे हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे केली. श्रीमती वंदनाताई सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पडलवार सरांनी केले. सर्वाचे आभार जगन सोळुंके यांनी मानले.